होळ हद्दीतील अवैद्य कोळसा साठे जप्त करावेत
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ या ठिकाणी अवैद्य कोळसा साठा जप्त करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी
अशी मागणी कोऱ्हाळे येथील विश्वजित दत्तात्रय माळशिकारे यांनी पणदरे वनमंडलचे वनपाल यांच्याकडे केली आहे.
याबाबत माळशिकारे यांनी वनपाल यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सदर हद्दीमध्ये वनरक्षक योगेश कोकाटे यांच्या आर्थिकहितसंबंधापोटी राजरोसपणे कोळसा काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत वनरक्षक कोकाटे यांनी वारंवार फोन वरूनव प्रत्यक्ष माविषयी माहीती देऊनही त्यांनी या विषयातआपल्या कर्तव्यात कसूर केली आहे असे दिसते. तरी सदरचे अवैध कोळशे साठे जप्त करून वनरक्षण करावे. तसेच योगेश कोकाटे यांचे निलंबन करावे, याबाबत आपण तशी वरिष्ठांकडे शिफारस करावी असे तक्रारी अर्जात म्हटले आहे
COMMENTS