वाघळवाडीतील टीव्ही आणि डिश चोरीप्रकरणी एक जण ताब्यात; मुद्देमाल जप्त
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाघळवाडी ता बारामती येथील ऑफिस मधील टी व्ही आणि डिश चोरी प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एक ताब्यात घेतला आहे.
याबाबत वाघळवाडी गावचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांच्या खाजगी ऑफिस मधील टी व्ही आणि डिश दि ८ रोजी चोरीस गेल्यानंतर त्यांनी करंजेपुल पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात गुप्त माहितीनुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली असता हा टी व्ही शेंडकरवाडी या ठिकाणी विकला असल्याचे पोलिसांनी समजल्यावर पोलिसांनी या बाबत एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. तर चौकशीसाठी एक संशयीत ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र फणसे व पोलीस नाईक नितीन बोराडे करत आहेत
COMMENTS