वाढदिवसाचा खर्च टाळून पत्रकार संघाच्या सदस्यांना सॅनिटायजर व मास्क वाटप

Admin
वाढदिवसाचा खर्च टाळून पत्रकार संघाच्या सदस्यांना सॅनिटायजर व मास्क वाटप

पुरंदर : प्रतिनिधी

 सध्या कोरोना विषणूचा प्रादुर्भाव ग्रामिण भागात वाढत आहे. यासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीने कोरोना विरोधात लढा देत आहेत. अशावेळी आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा, वाढदिवस साजरा करण्यासाठी लागणारा खर्च न करता; त्याचा योग्य मार्गाने उपयोग व्हावा म्हणून नीरा येथील पत्रकार भरत निगडे यांनी आपल्या पत्रकार मित्रांना सॅनिटायजर व मास्कचे वाटप केले.
            नीरा येथील पत्रकार भरत निगडे हे अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात. बुधवार (२४ जून)  त्यांचा वाढदिवस होता. दरवर्षी ते आपला वाढदिवस वृक्षारोपण, प्राथमिक शाळेत चित्रकला साहित्य वाटप, अनाथाश्रम, मतिमंद शाळा, आश्रम शाळेत अन्नदान करत साजरा करतात. मात्र यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या युद्धामध्ये जे रणांगणात उतरून लढाई करत आहेत अशा योद्ध्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.  सध्या सर्वत्र सॅनिटायजरच्या किमती वाढत असल्याने  ते मुबलक प्रमाणात मिळायला कठिण झाले आहे. 
        निगडे यांनी यापूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांनसह कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील प्रांत, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, जेजुरी व सासवड नगरपरिषद, पोलीस स्टेशन, पुरंदर ग्रामिण महिला संस्था, जिल्हा आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, एकात्मिक बालविकास सेवा योजना, जेजुरी मार्तंड देवसंस्थान, विविध मंडळे, संस्था, फाउंडेशन यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. तसेच एका सहकार्याच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील नीरा, बेलसर, वाल्हे, परींचे, माळसिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सासवड, जेजुरी, सासवड व जेजुरी, सासवड पोलीस स्टेशन नीरा, वाल्हे, परिंचे पोलीस दुरक्षेत्र, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सासवड या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी दोन हजार हॅन्डग्लोजचे वाटप केले आहे.
       बुधवारी निगडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुका पत्रकार संघच्या ८५ सदस्यांना सॅनिटायजर व मास्क वटप केले. जेजुरी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करत संपन्न झाला. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख बी.एम.काळे, शिवराज झगडे, प्रकाश फाळके, विजयकुमार हरिश्चंद्रे, अमोल बनकर, योगेश कामथे, किशोर कुदळे यांनसह काही मोजकेच पत्रकार उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी निगडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. निलेश जगताप यांनी स्वागत व प्रास्तावीक केले तर आभार गोविंद लाखे यांनी मानले.
To Top