खा.सुप्रिया सुळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला पुरंदर तालुक्याचा आढावा

सोमेश्वर रिपोर्टर live
खा.सुप्रिया सुळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला पुरंदर तालुक्याचा आढावा  

पुरंदर :   प्रतिनिधी

 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल शुक्रवार दि.१९ रोजी पुरंदर तालुक्यात भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर मधील विविध विषयांचा आढावा घेतला. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी येथील शेती विषय काय समस्या आहेत का? किंवा आरोग्यविषयक समस्या याबाबतची विचारणा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये सासवडच्या व पुरंदर मधिल अवैधरित्या विक्री होत असलेल्या घातक मावा विषयी चर्चा चांगलीच रंगली.
          पुरंदरचे आमदार संजय जगताप, पंचायत समिती सभापती नलिनी गोळे, पुरंदरचे-दौंडचे प्रांत अधिकारी प्रदिप गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, सासवड, जेजुरी पोलिस स्टेशनचे अधिकारी यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खा. सुळे म्हणाल्या की, कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत मोठा बदल करावा लागलेला आहे. लोकसंपर्क करत असताना तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत आहे. कोरोनाच्या बाबात माहिती घेत असताना किंवा काम करत असताना प्रशासनाची संपर्क साधत असताना सोशल मीडियाचा वापर करावा लागला. गेल्या साडेतीन महिन्यात प्रशासनाने खूप महत्त्वाच काम केले, आणि अत्यंत चांगलं काम केले आहे. अगदी पुणे जिल्ह्याचे एसपी हे सुद्धा आपल्या कुटुंबापासुन दुर रहात काम करीत होते. सोशल डिस्टंनस पाळत मुलांन पासुन दुर रहात घराच्या बाहेर जेवण करायचे.
            कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. याकाळातील समाधानाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोणीही या काळामध्ये उपाशी राहिल नाही. कोणी उपाशी राहणार नाही यासाठी प्रशासनाने मोठी जबाबदारी घेतली होती. या काळामध्ये जे परराज्यातील कामगार होते त्यांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. दुर्दैवाने त्यांना इथुन जावं लागलं. या कामगारांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही स्वतः शरद पवार आणि मी केंद्रातील मंत्र्यांची संपर्क साधून या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या घरी कसे पाठवता येईल याबाबत प्रयत्न केले. असे त्या म्हणाल्या.
            त्याच बरोबर सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री जयशंकर यांचे विशेष आभार मानले. कारण ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राज्यातील मुले परराज्यात, किंवा परदेशात अडकली होती त्यांना माघारी आणण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी तातडीने मदत करित विद्यार्थ्यांना घरी येण्यास मदत केली. अस त्या म्हणाल्या.
              बारामती लोकसभा मतदारसंघ व शिरूर लोकसभा मतदारसंघांमधून या काळामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून खासदार अमोल कोल्हे मी आणि या भागातील सर्वच आमदार आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होतो. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा औषध कमी पडू नये म्हणून प्रयत्न करत होतो. त्याबरोबर या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणीटंचाई जाणवली नाही. जनावरांच्या चा-याचा किंवा औषधाचा प्रश्न उद्भवला नाही. ही आनंदाची बाब आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ही अत्यंत उत्तम काम झाले.

     जेजुरीचा खंडोबाच्या दर्शनासाठी पायरीवर दर्शनाची सोय करण्याची मागणी होते आहे किंवा त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर टीव्ही जोडा अशीही मागणी होते आहे. याबाबत विचार करण्यात येईल. त्याचबरोबर सलूनबाबातचा एक प्रश्न आहे. तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत विचार विनीमय सुरू आहे. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेवुन सलुन सुरू करण्यासंदर्भात काहीतरी उपाययोजना करता येतील. काही अटी व शर्तीनवर सलुन बाबात निर्णय घेतला जाईल. असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
    पत्रकारांच्या प्रश्‍नोत्तराच्या दरम्यान सासवड व पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये अवैध व घातक मावा विक्री लॉकडाऊंच्या काळातही राजरोसपणे सुरू होती. तसेच अन्न व औषध प्रशासन कोणतीच दखल घेत नाही, पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने खबरदारी घ्यावी व धडक कारवाई करावी अशी अपेक्षा पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी व्यक्त केली. यावर उपस्थित आमदारांनी पहिले पत्रकारांनी मावा खाण्याचे बंद करावे असा मिश्किल टोला मारला. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या बहुतांश पत्रकार हे माळकरी व निर्व्यसनी असल्याचे पत्रकारांनी सांगितले व ज्या पत्रकाराने हा प्रश्न उपस्थित केला त्यांनी ठोकपणे मी मावा खात नाही त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे व पुढील काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यावर बंदी आणणार आहे. त्यामुळे मावा विक्री बंद झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले. या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मावा म्हणजे गुटका का? असा प्रश्न विचारला तो जर पान टपरीवर मिळत असेल तर सध्या पानटपऱ्या बंद आहेत. मग हा मावा कुठून मिळतो असा प्रश्न उलट प्रश्न पत्रकारांना विचारला. यावर बैठकी मधील आजी-माजी आमदार व लोकप्रतिनिधी यांनी मोठा हशा करत स्पष्ट सांगितले की या मागे मोठी कंपनी आहे. सुपारी कटिंग करण्याची एक कोटीचे मशीन सध्या पुरंदर मध्ये आहे. त्यामुळे हा मावा सध्या वाढीव दराने घरपोच मिळत आहे. तर लॉकडाउनच्या काळात पुणे, हडपसर, बारामती आदी भागातून मावा शौकीन सासवड-पुरंदरच्या गावांमधून मावा होलसेल पद्धतीने घेऊन जात होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी हात जोडून या सर्व गोष्टींवर न बोलणे पसंत केले पण पुढील काळात हा मावा बंद झालाच पाहिजे असे सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले.
To Top