पुरंदरच्या सासवड येथील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात कोरोनाचे एकूण बळींची संख्या तीनवर गेली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील साळे आळीतील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाचा काल मृत्यु झाला आहे. अंदाजे वय ७० वर्षे. तालुक्यातील कोरोना बाधित झाल्यानंतर मयत रुग्णांची संख्या तीन झालेली आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना सासवड येथील तोरणा सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट मागील आठवड्यात पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काल रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
COMMENTS