जेजुरीत वृद्ध महिलेला रेल्वेने चिरडले.

Pune Reporter
जेजुरीत वृद्ध महिलेला रेल्वेने चिरडले.

पुरंदर :  प्रतिनिधी

रेशनिंग घेऊन घरी परतत असताना रेल्वे ने महिलेला  चिरडल्याची घटना जेजुरी मध्ये घडली आहे. रेल्वेचा पादचारी पुल वर्षभरापासून बंद असल्याने वृद्धेचा नाहक बळी गेल्याने स्थानिक रहिवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.
       लीलावती नानासो पाटील (वय ७०) रा. जेजुरी रेल्वे स्टेशन. रेल्वे रूळ ओलांडून जात असताना अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आहेत. जेजुरीच्या रेशनिंग दुकानातून परत घरी जाताना रेल्वे रूळ ओलांडत असताना भरधाव रेल्वे ने चिरडले. त्यांच्या शरिराचे छन्नविछीन्न तुकडे झाले.
         जेजुरी रेल्वे स्टेशन नजीक रूळ पार करत असताना एक ७० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षभरापासून जेजुरी रेल्वेस्टेशन वरचा रेल्वे पादचारी पूलाचे नुकसान झाले होते. त्यांच्या दुरुस्ततीचे काम होत असल्याने रेल्वे कडून तो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या लोकवस्तीकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जिव धोक्यात घालत रेल्वे रुळावरून जावं लागत आहे. त्यामुळे आज एका ७० वर्षीय महिलेला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दिल्ली हुन जाणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेस ने या महिलेला रुळावर चिरडले. ही महिला रेशनिंग आणायला गेली होती. जेजुरीतुन रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या घरी परतत होती. तर पुण्याच्या बाजूने भरधाव येणारी रेल्वे आवाज न करता आली. रेल्वे अचानक समोर आल्याने तीला जोरदार धडक दिली व त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. 
       या रेल्वेस्टेशन वर जेजुरीत येणारे भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या पुलाचे काम लवकर होणे गरचेचे होते. लोकप्रतीनीधींच्या हट्टापाई दर्शनी भागावर मोठ्या प्रमाणावर खर्च करून गडाची प्रकृती केली. मात्र लोकांच्या सुरक्षिततेला तिलांजली वाहिल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन असलेल्याने लोकांची वर्दळ सध्या कमी आहे. रेल्वे मंत्रालय फक्त सुशोभीकरणासाठी मोठा खर्च करत आहेत, पण रहिवासी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेला फाटा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जेजुरीत भाविकांची येण्याची संख्या मोठी असते जीव धोक्यात घालत लोक स्थानिकात येतात. हा रेल्वे पादचारी पूल लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी खा.सुप्रिय सुळे यांना करणार असल्याचे प्रवशी संघटना व रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
To Top