सोमेश्वर कारखाना बेसलडोससाठी प्रतिटन १०० रुपये सभासदांच्या खात्यावर जमा करणार
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने २८००/- रुपये प्रति मे.टनप्रमाणे पुर्ण पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असुन लवकरच अजुन प्रति मे.टन १००/- रुपये प्रमाणे बेसल डोससाठी आपण पैसे वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये एकुण ९ लाख ३४ हजार ७८४ मे.टन ऊसाचे गाळप करुन संपुर्ण पुणे जिल्ह्यात ऊस गाळप, साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा या बाबतीत क्रमांक एकवर राहुन ११.८६ टक्के साखर उतारा राखीत ११ लाख ८ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले होते. त्याचप्रमाणे कारखान्याच्या को जन प्रकल्पातुन ९ कोटी ३५ लाख ३७ हजार १८२ युनिट्स वीजेची निर्मीती करुन ६ कोटी ३४ लाख १ हजार युनिट्स वीजेची कारखान्याने विक्री केली.
तसेच कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पामधुन ८२ लाख ८६ हजार २०६ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेत आपण सर्वच बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर राहिलो. आपण गाळप केलेल्या संपुर्णउसाचे एफआरपीप्रमाणे होणारे एकुण २८००/- रुपये प्रति मे.टनप्रमाणे पुर्ण पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असुन लवकरच अजुन प्रति मे.टन १००/- रुपये प्रमाणे बेसल डोससाठी आपण पैसे वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १००/- रुपये प्रति मे.टन प्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा घेण्यात आला असुन ही रक्कम लवकरच सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईन.
येणा-या हंगामासाठी बेसलडोस साठी व शेतक-यांच्या लागणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत या हेतुने सभासदांच्या खात्यावर १००/- रुपये प्रति मे.टनप्रमाणे रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. येणा-या हंगामासाठी कारखान्यातील अंतर्गत दुरुस्तीचे कामे प्रगतीपथावर असुन सर्वांच्या सहकार्याने येणारा गाळप हंगामही यशस्वीरीत्या पार पाडु असा विश्वास अध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला
COMMENTS