पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली आहे. या धडक कारवाईत ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच तीन पत्ते जुगार पैशावर खेळताना ११ जणांना ताब्यात घेतले असल्याचे जेजुरी पोलीसांनी सांगितले.
जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दि.५ रोजी सव्वाचारच्या सुमारास जेजुरी नजीकच्या साकुर्डे गावचे हद्दीत चव्हाणवस्ती येथील जगताप पोल्ट्री फार्म जवळ मोकळे जागेत उघड्या मैदानावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय वाघमारे यांनी सहकार्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ११ लोक गोलाकार पद्धतीने तीन पत्ती जुगार पैशावर खेळताना रंगेहाथ सापडले. ११,८०० रुपये रोख रक्कम ही मिळुन आली. हे सर्व जुगारी सासवड जेजुरी येथील रहिवाशी असलेल्याचे बोलले जात आहे.
साकुर्डे येथील जुगार अड्ड्यावर धडक कारवाईमुळे पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात अजून किती गावात अशा पद्धतीने जुगार अड्डे चालवले जात आहेत हे पाहणे गरजेचे आहे. त्या प्रत्येक अड्ड्यावर पोलीस कारवाई करणार आहेत. त्यासाठी स्थानीक नागरिकांनी न घाबरता पोलीसांना कळवावे त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल याचा विश्र्वास यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिला आहे. लोकांनी अवैध व्यावसायिकांना पाठिशी घालू नये. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ शकते यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे ही माने पुढे म्हणाले.
आजच्या धडक कारवाईमुळे तालुक्यात जेजुरी पोलीसांनची प्रतिमा उंचावली असून तालुक्यातील महिला कौतुक करत आहेत. या धडक कारवाईत फौजदार विजय वाघमारे, नंदकुमार सोनवलकर, पोलीस नाईक शैलेश स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र खाडे, महेश उगले, सचिन किवळे, अतुल मोरे, गजेंद्र बिरलिंगे यांनी सहभाग घेतला होता. ११ जुगा-यांन विरोधात जेजुरी पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश किवळे यांनी फिर्यादी दिली आहे. तर गणेश गोरखनाथ कुतवळ हे गुन्ह्याचा पुढिल तपास करीत आहेत.