लग्नाचा वाढदिवसानिमित्त किराणा साहित्याचे वाटप
पुरंदर प्रतिनिधी
लपतळवाडी ता ,पुरंदर येथील विलास किसन पिलाने हे नोकरी निमित्त मुंबई येथे असतात,कोरोनाच्या मुळे अनेक चाकरमानी आपल्या गावी आले आहेत, सध्या लॉकडाऊन चा कालावधी असल्यामुळे अनेकांना घरी राहावं लागतं आहे अनेकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.
याची जाणीव ठेवून विलास पिलाने आणि सुषमा पिलाने यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गरीब आणि गरजू लोकांना किराणा मालाच्या किट च वाटप केले, लपतळवाडी येथील गरीब आणि गरजू अश्या अठरा कुटुंबांना किराणा मालाच्या किटच वाटप केले आहे साखर, तांदूळ, तेल ,चहा पावडर, मूग डाळ,साबण अश्या वस्तूंचं वाटप करण्यात आले.
विलास पिलाने यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे ,चाकरमानी जरी नोकरी व्यवसायाच्या निमित्त शहरात असले तरी तरी त्यांची नाळ गावाशी जोडलेली असते हे विलास पिलाने यांच्यावरून लक्षात येत.