पुरंदरमधील मांढरगावतील रुग्णाच्या संपर्कातील एकाच रिपोर्ट पॉझिटिव्ह.

Pune Reporter
      
पुरंदरमधील मांढरगावतील रुग्णाच्या संपर्कातील एकाच रिपोर्ट पॉझिटिव्ह.

पुरंदर :प्रतिनिधी 

   पुरंदर तालुक्यातील मांढर येथील पहिल्या कोरोना मृत्यू झालेल्या रुग्णाच्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुरंदर मध्ये एका  कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. आता पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली असून एकूण संख्या सहा झाली आहे.
        पुरंदर तालुक्यातील मांढर येथील एका वृध्दाचा त्यांच्या जुन्या आजाराने सोमवारी दि.२ रोजी मृत्यु झाला होता. ते मांढर येथील एक मंदिराचे सेवक होते. ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची कोरोना टेस्टसाठी स्वॅप घेतला होता. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरंदर तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण मृत झाल्याचे स्पष्ट झाले होते. मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट प्रलंबित होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा रिपोर्ट पुरंदरच्या प्रशासनाने पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले आणि पुरंदरकरांना धक्का बसला होता.
    या वृद्ध व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट प्रलंबित असताना त्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे गावती किंवा नातेवाईकांना संसर्ग होण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. गावातील व जवळच्या नातेवाईकांनी यासंदर्भात खबरदारी घेतली होती. तरी त्या वृद्ध व्यक्तीचा संपर्कात आलेल्या त्यांच्या चुलत भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज पुणे येथील शासकीय रुग्णालयात त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर झाल्यानंतर पुरंदर मध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुरंदरचे प्रशासन तालुक्यात कोरोना प्रसार रोखण्यात यशस्वी होत असतानाच एका व्यक्तीला कोरोना लागण झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
To Top