कोऱ्हाळे बु ॥चे सहा पैकी दोन निगेटीव्ह तर चार अहवाल वेटिंग वर
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु॥ येथील काल सहा जणांची चाचणी करण्यात आली होती त्यापैकी दोन जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून चार जणांचे अहवाल वेटिंग वर ठेवण्यात आले आहेत.
कोऱ्हाळे बु येथील एका जेष्ठ व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 12 जणांचे अहवाल तपासल्यानंतर काल त्यापैकी अकरा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते तर जेष्ठाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल पुन्हा त्याच घरातील पाच व्यक्तींचा आणि अजून एका व्यक्तीची चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी दोन जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून चार जणांचे अहवाल वेटिंगवर ठेवण्यात आले आहेत