पुरंदरच्या नाझरे सुपे मधील सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जवळच्या संपर्काती ६ जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सहा जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पुरंदरकरांनी सुस्कारा सोडला आहे. मागील आठवड्याभरात रुग्ण संख्या पाच वर रोखण्यात पुरंदरच्या प्रशासनाला यश आले आहे.
जेजुरी नजीकच्या नाझरे सुपे येथील रुग्णाच्या संपर्कातील (हायरिस्क कॉन्टॅक्ट) सर्व ६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आज शुक्रवारी दिली. मागील आठवड्यात दि. ३० रोजी सायंकाळी मिळालेल्या रिपोर्टनुसार नाझरे सुपे येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यांच्या संपर्कातील सर्व सहा जणांची कोरोना तपासणीसाठी स्वॉप घेऊन शासकीय लॅब्रोट्रीमध्ये पाठवले होते. आज शुक्रवारी सकाळी या सहा जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी व पुरंदरच्या प्रशासनाने समाधान व्यक्त केले. मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यातील कोरोना पोजिटीव्ह रुग्णांची संख्या त्यावेळी सहावर गेली होती; पण वीर येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या युवकाला रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे आता मागील आठवड्याभरात रुग्ण संख्या पाच वर रोखण्यात पुरंदरच्या प्रशासनाला यश आले आहे.