नीरा बुवासाहेब ओढ्यात अनोळखी मृतदेह आढळला

Pune Reporter
नीरा बुवासाहेब ओढ्यात अनोळखी मृतदेह आढळला

पुरंदर : प्रतिनिधी 
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यात एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात हा मृतदेह दिसुन आल्याने रस्त्यावरील लोकांनी नीरा पोलीसांना सांगितले. नीरा दुरक्षेत्रातील पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह वाहत्या पाण्याच्या बाहेर काढला असून ओळख पटवली जात आहे.
   नीरा (ता.पुरंदर) येथील नीरा बारामती रोडवरील बुवसाहेब ओढ्यावरील पुलावरून एक व्यक्ती पडल्याची धोकादायक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.  आज शुक्रवारी सकाळी एक व्यक्ती बुवासाहेब मंदिराशेजारील ओढ्याच्या वाहत्या पाण्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. हा व्यक्ती पांढरे धोतर तीन बटनी पांढरा झब्बा अंगात घातलेला आहे. तर लाल रंगाचा पटका डोक्यावर होता. अंदाजे वय ७० वर्ष असावे. 
     या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, होमगार्ड बरकडे पोलीस मित्र अण्णा नलवडे, रामभाऊ कर्णवर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ओढ्यातुन बाहेर काढत पुढील शासकीय सोपस्कार करण्यासाठी रवाना केला आहे. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नीरा पोलीस दुरक्षेत्राशी संपर्क करण्याचे आवाहन हवालदार सुदर्शन होळकर यांनी केले आहे.
जाहिरात
To Top