सोमेश्वर कारखान्याकडून २५ हजार झाडांचे संगोपन: जागतिक पार्यावरण दिन

Pune Reporter
सोमेश्वर कारखान्याकडून २५ हजार झाडांचे संगोपन: जागतिक पार्यावरण दिन

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या पाच वर्षात २५ हजार झाडे लावून त्याचे व्यवस्थित संगोपन देखील केले आहे. 
            सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व संचालक मंडळाने कारखान्याचा कारभार उत्तमरीत्या पाहत असतानाच कारखाना कारखाना परिसरामध्ये  झाडे लावण्याचे काम हातात घेतले, आज कारखाना परिसरात संचालक मंडळाने चिंच, नारळ, आवळा, चिक्कू, एफझोरा, कुरंदा, कोकनवेल तसेच शोभेची अशा विविध प्रकारची २५ हजार झाडांचे रोपण करून संगोपन केले आहे. 

पुरुषोत्तम जगताप- अध्यक्ष सोमेश्वर कारखाना
कारखाना परिसरात २५ हजार झाडे लावून संगोपन करत असतानाच कार्यक्षेत्रातील सभासदांना ५० टक्के अनुदानावर जवळपास १६ हजार  फळ झाडांचे वाटप केले असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी १० हजार झाडे वाटप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. 

विराज निंबाळकर- ऊसविकास अधिकारी
ही २५ हजार झाडे लावून संगोपन करत असतानाच त्याची छाटणी, खते, खुरपणी, पाणी, औषध फवारणी वेळच्या वेळी करावी लागत आहे. यासाठी संचालक मंडळाचे वेळेवेळी मार्गदर्शन असते
जाहिरात
To Top