वटपौर्णिमाला सोशल डिस्टंसींगचे पालन करावे. रुपाली सरनोबत
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सतर्कता घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. शुक्रवारी होत असलेल्या वटपौर्णिमेच्या सणा निमित्त महिलांनी काळजी घ्यावी. शक्यतो घराबाहेर जायचं टाळा. घरातच प्रतिकात्मक वटपौर्णिमेच पुजन करावे. वटपौर्णिमाला सोशल डिस्टंसींगचे पालन करावे. असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.
वटपौर्णिमाचा सण हा महिलांच्या जिव्हाळ्याच व आत्मतीयतेच सण आहे. वडाची पुजा किंवा फेरे मारण्यासाठी महिला घराबाहेर जातात तेथे काळजी घ्यावी. हा सण साजरा करताना सोशल डिसटंसिगचे पालन करावे. बाहेर वढाच्या पुजलेला गेलाच तर सामाजिक अंतर ठेवून कमित कमी वेळात पुजा करुन घरी यावे. शक्यतो घरीच प्रतिकात्मक वटपौर्णिमेच पुजन करावे. पण यासाठी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून आणु नये. वडाच्या फांदीची पुजा करु नये. वडाच्या झाडाचे नुकसान करु नये. घरि शक्यतो वडाचे चित्र काढून किंवा वडाच्या झाडाच्या फोटोचे पुजन करुन प्रतिकात्मक वटपौर्णिमा साजरी करावी. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात एक पर्यावरणाचा -हास होतोय तो समतोल राखला जाईल आणि कोरोनाच्या संसरर्गाची भितीही राहणार नाही असे सरनोबत पुढे म्हणाल्या.