कोऱ्हाळे बु ॥ च्या त्या रुग्णाच्या पत्नी चा रिपोर्ट पॉझिटीव्ह

Pune Reporter
कोऱ्हाळे बु॥ च्या त्या रुग्णाच्या पत्नी चा रिपोर्ट पॉझिटीव्ह


सोमेश्वरनगर    प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु ॥ या ठिकाणी एका वयोवृद्ध जेष्ठांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील १२ जणांची कोरोना चाचणी केली होती त्यापैकी ११ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्याच्या पत्नीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. 

     कोऱ्हाळे या ठिकाणी  कोरोना पेशेंट सापडल्यानंतर कोऱ्हाळे हे गाव २८ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोऱ्हाळे बु गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केले जाणार आहे.  पुण्याला गेलेल्या त्या आठ लोकांची चाचणी आज  करण्यात येणार आली असून त्यांचे रिपोर्ट उद्या पर्यंत येतील अशी माहिती डॉ खोमणे यांनी दिली. 
           काल कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी १० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून उर्वरित दोघांचे रिपोर्ट आता उपलब्ध झाले असून त्यातील एक पॉझिटिव्ह तर एक निगेटीव्ह आला आहे.  
जाहिरात
To Top