वाणेवाडीत पुन्हा एकदा कोथिंबीरीला एकरी २ लाख ७५ हजाराचा दर
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
गेल्या पाच महिन्यात तरकारी पिकात बुडालेल्या शेतकऱ्यांना कोथिंबीरीने तारले आहे. गेल्या आठवड्यात एक एकराला तब्बल ३ लाख २१ हजार एवढा उच्चाकी दर मिळाला होता तर आज वाणेवाडी (मळशी) येथील सुनील सदाशिव काकडे यांच्या एक एकर कोथिंबीरीला एकरी २ लाख ७५ हजार रुपये दर मिळाला आहे.
गेल्या आठवडयात संजय जगताप यांच्या कोथिंबिरीला एकरी ३ लाख २१ हजार तर आज सुनील काकडे यांच्या कोथिंबीरीला एकरी २ लाख ७५ हजार दर मिळाला आहे. हे दर गेल्या पाच वर्षातील उच्चाकी दर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सासवड येथील कोथिंबीरीचे व्यापारी काका शिवरकर यांनी ही कोथिंबीर खरेदी केली आहे.