श्री.संत सोपानकाकांच्या पादुका ३० जूनला पंढरपूर जाणार.

Pune Reporter
श्री.संत सोपानकाकांच्या पादुका ३० जूनला पंढरपूर जाणार.


पुरंदर :  प्रतिनिधी

        सासवडच्या श्री.संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी निघणार नसून काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फक्त पादुका ३० मे (दशमी) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करतील; अशी माहिती सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख गोपाळ गोसावी महाराज यांनी दिली. ते आज सासवड येथील सोपानकाका महाराजांच्या समाधीस्थळी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
             संत परंपरेतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, गुजरात या राज्यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. सर्वात मोठा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असतो त्यापाठोपाठ सासवड येथील श्री.संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा ही मोठ्या प्रमाणावर असतो.
         कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे मागील दोन महिने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर आता लॉकडाऊन शिथिल केला आहे. जनजीवन तुरळक प्रमाणात प्रमाणावर सुरू करण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. पण ज्या ठिकाणी गर्दी होईल किंवा जास्त लोक जमतील अशा ठिकाणी असे कुठलेही मोठे उत्सव पुढील काळात होणार नाहीत. याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे सर्व पालखी सोहळे यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. फक्त मोजक्या लोकांमध्ये पादुका पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. सासवडच्या श्री.संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी निघणार नसून फक्त मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पादुका ३० मे रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करतील अशी माहिती सोपानकाका पालखी सोहळ्याचे प्रमुख गोपाळ गोसावी यांनी दिली.
           दरवर्षी श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकादशीला सासवड येथे दोन दिवसासाठी विसावतो. त्यावेळी दुसऱ्या दिवशी सोपानकाकांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे सर्व पालखी सोहळे रद्द केले असल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ही‌ रद्द करण्यात आला आहे. तसाच श्री संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा ही रद्द करण्यात आला असून प्रथेप्रमाणे १८ जूनला (द्वादशी) सोपान काकांच्या पादुकांचे प्रस्थान होणार आहे. मात्र पुढील बारा दिवस या पादुका सोपानकाका समाधी स्थळी राहणार आहेत. ३० जूनला या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. 
         ‌पालखी सोहळा संदर्भात पुण्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी १९ मे ला एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा प्रमुख यांच्याशी विचार विनिमय करल्यानंतर काही निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखी मधून ट्रक, एसटी बस किंवा हेलिकॉप्टरमधून थेट पंढरपूरकडे रवाना होतील. त्याचबरोबर गोपाळ गोसावी महाराज यांनी लेखी निवेदन दिले होते. सोपानकाका महाराज, निवृत्ती महाराज, एकनाथ महाराज,मुक्ताबाई या चार संतांच्या ही पालखी सोहळे मोजक्या लोकांमध्ये नेण्याची परवानगी द्यावी. यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भुमिका घेत या पालखी सोहळ्याला मोजक्या लोकांमध्ये फक्त पादुका पालखी नव्हे फक्त पादुका घेऊन सोहळ्यातील २० लोकांना पंढरपूर कडे दर्शनाला जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र या लोकांसह पादुका कशाप्रकारे नेता येतील यासंदर्भात पुढील काळात सूचना करण्यात येतील. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी या तंतोतंत पाळल्या जातील. पालखी सोहळा न काढता काही मोजक्या लोकांमध्ये फक्त पादुका पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याची तयारी सध्या सुरू आहे.
जाहिरात
To Top