नसरापूरमध्ये रक्तदान शिबिराला तरुणाचा प्रतिसाद.

Pune Reporter
नसरापूरमध्ये रक्तदान शिबिराला तरुणाचा प्रतिसाद

भोर :प्रतिनिधी 

       रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते यासाठी तरुण पिढीने रक्तदान करण्यासाठी मोठया प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे’ असे आवाहन सिध्दीविनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी केले. यावेळी रक्तदानाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

      श्री.शिवराज्यभिषेक दिनानिमित्त अखिल नसरापूर गाव शिवजयंती उत्सव वतीने नसरापूर (ता.भोर ) येथील भैरवनाथ मंदिरात रक्तदान शिबिर आयोजन केले होते. यावेळी डॉ. राजेंद्र डिंबळे बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, सुधिर वाल्हेकर, माजी सरपंच भरत शेटे, रमेश कदम, संजय घाटे, भुषण डिंबळे, अमोल दळवी, माजी उपसरपंच शंकर शेटे, इरफान मुलाणी, बाबु झोरे, दादा जगताप, अमित खुटवड, माउली शेटे, दादा वाल्हेकर, गणेश दळवी, संतोष विंचूरकर, दुर्गेश मुजुमले, आधार ब्लड बँकेच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. एस. एम. पाटील, डॉ.अलका शिंदे व तपासणीसाठी डाॅक्टराचे पथक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ९६ जणांनी नोंद केली त्यातील जवळपास ९१ रक्तपेढीचे संकलन करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना संयोजकांच्या वतीने प्रशस्तीपत्रक, सेनीटायझर, मास्क हेंडगलोज व रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या देण्यात आल्या.


      महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदात्याकडून भागविली जाते. मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होत असल्याची माहिती डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी दिली प्रतिसाद मिळाला

जाहिरात
To Top