सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, वडगाव निंबाळकर येथील नाभिक समाजाची मागणी

Pune Reporter
सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, वडगाव निंबाळकर येथील नाभिक समाजाची मागणी 


संतोष भोसले

वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी 


इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वडगाव निंबाळकर येथील नाभिक समाजाच्या वतीने  शासनाकडे पत्रकाद्वारे केली आहे. 


नुकतेच याविषयीचे निवेदन मंडलाधिकारी संजय माने,  यांच्याकडे  देण्यात आले. यावेळी तलाठी रविंद्र कदम, संत सेना महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानदेव राऊत, गणेश जाधव, भरत क्षीरसागर, पांडुरंग पवार, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या सुरूवाती पासून गावातील सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अधिककाळ दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिक आणि कारागीर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन नंतरही व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. इतर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप सलून व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली नाही.  कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने वडगाव निंबाळकर गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी संपल्यानंतर गावातील सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्राहक आणि सलून कारागिरांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी सर्व अटींचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, असे आश्‍वासनही नाभिक समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आले. 
जाहिरात
______
To Top