कोरोनामुळे सुप्याचा आठवडे बाजार बंदच राहणार
सुपे दीपक जाधव प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुपे ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडे बाजार दिर्घ काळासाठी बंदच राहणार आहे. जिल्हाधिकारी यांनी बाजार सुरु करावेत असा आदेशा दिला होता. मात्र स्थानिक बाबी लक्षात घेवुन ग्रामपंचायतीने आठवडे बाजार बंद ठेवला आहे.
सद्या कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रसार राज्यात झपाट्याने फैलावत आहे. तसेच पुणे जिल्हा हा रेड झोन मध्ये येत आहे. त्यामुळे आठवडे बाजारात पुणे व परिसरातुन येणाऱ्या व्यापाऱ्यांची वर्दळ वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवू शकतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजार सुरु ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या अटी अधिकच जाचक आहेत. त्यातील बहुतांश अटींची पुर्तता करणे ग्रामपंचायतींला शक्य नाही. त्यामुळे येथील आठवडे बाजार बंद ठेवणे योग्य होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कमिटी तसेच व्यापारी वर्गाने दिल्याचे सरपंच स्वाती हिरवे तसेच ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी सांगितले.
........................................