पुरंदर तालुक्यातील गु-होळी गावातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.

Admin
पुरंदर तालुक्यातील गु-होळी गावातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.


पुरंदर : प्रतिनिधी

     पुरंदर तालुक्यातील गु-होळी गावातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट आज संध्याकाळी पॉझिटिव्ह आला आहे; अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
      गु-होळी गावातील एका व्यक्तीचा कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुरंदर मध्ये आता करोना रुग्णांची संख्या सहा झाली आहे. हा रुग्ण दोन जून रोजी मुंबई येथून आपल्या मूळ गावी आला होता. त्यानंतर त्याला त्रास झाल्याने त्याने शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट आज दि. ८ जून संध्याकाळी आठ वाजता पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मांढर येथील‌ कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या भावाचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यांच्या संपर्कातील इतर १८ लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पुरंदर मध्ये मागील दोन दिवसापूर्वी इतर पाच रुग्णांच्या संपर्कातील कोणीही पॉझिटिव्ह न आल्याने प्रशासनाने निश्वास सोडला होता. मागील दोन दिवसांत एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आल्याने पुरंदरच्या प्रशासन निवांत झाले होते. मात्र आज संध्याकाळी  गु-होळी येथील मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. मात्र हा व्यक्ती मुंबईहून आल्यानंतर घरातच असल्याने त्याचा संपर्क जास्त लोकांशी आला नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका खूप कमी असणार आहे. तरीही पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती समाधानकारक आहे. 
     आज चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर अनलॉक १ सुरु झाला आहे. महाराष्ट्रात याला बिगनिंग अगेन असे संबोधले जात आहे. जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे मागील नव्वद दिवस केलेल्या कामाची पावती किंवा प्रशंसा करण्यासाठी सोमेश्वर रिपोर्टर यांनी पुरंदरच्या प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी सामाजिक संघटना संस्था, ट्रस्ट तसेच विविध संघटना अशा ३३ कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सोमेश्वर रिपोर्टर यांनी पुरंदर तालुक्यातील कोरोना युद्धाला त्याच्या कार्यालयीन ठिकाणी हे सन्मानपत्र प्रदान केले. पुढील काळात या योध्याने कडून तालुक्यातील लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पुरंदर तालुका करुणा मुक्त ठेवण्यासाठी योद्धे कमी पडणार नाहीत असा विश्वास सोमेश्वर रिपोर्टरने व्यक्त केला आहे.
जाहिरात
To Top