सोमेश्वर रिपोर्टरने पुरंदरच्या कोरोना युद्धांना केले सन्मानित.
सन्मानपत्र देऊन केला गौरव.
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. त्यानंतर भारत सरकारने ही लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या काळात सर्व जनता घरामध्ये असली तरी शासनाचे महसूल, आरोग्य, पोलीस यंत्रणा व काही सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, ट्रस्ट तसेच फाउंडेशन हे रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होते. त्यांना यापुढील काळात कोरोना योद्धा २०२० म्हणून संबोधले जाणार आहे. पुरंदर तालुक्यातील अशाच काही कोरोना युद्धांना काल सोमवारी पुणे जिल्हा पत्रकार संघ, पुरंदर तालुका पत्रकार संघ व सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी सन्मानित केले. यामध्ये सोमेश्वर रिपोर्टरच्या वतीने सर्व कोरोना युद्धांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरंदर तालुका हा पुणे शहराच्या अगदी जवळ असूनही कोरोना संसर्गाचा तितकासा धोक येथे जाणवला नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रुग्णांची संख्या ठेवण्यामध्ये पुरंदरच्या प्रशासनाने काळजी घेतली. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी कोणाचाही संसर्ग कुटुंबातील किंवा घरातील व्यक्तींना होऊ दिला नाही. वेळच्या वेळी योग्य सूचना देऊन लोकांना सतर्क ठेवले. पोलीस प्रशासनाने पुरंदरच्या प्रत्येक चेक पोस्टवर खडा पहारा दिला. गावागावांमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासाठी जनजागृती करत कायद्याचा वचक ही दाखवला. २४ तास ड्युटी करून पोलीस कर्मचारी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करून डोळ्यात तेल घालून गेली नव्वद दिवस खडा पहारा ठेवला होता. त्यांच्या सोबतीला पोलीस पाटील, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही दिवस रात्र साथ दिली.
जिल्हा आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका यांनीही मोठे परिश्रम घेतले. कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना वेळेत कॉरेंटाईन करून शासकीय लॅबमध्ये तपासणी करून त्यांचे अहवाल लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले. नगर परिषद किंवा ग्रामपंचायत यांनी ही आपली भूमिका प्रकर्षाने वटवली. यामध्ये नगरपरिषद व ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी यांनी चौख जबाबदारी पार पाडली. विविध गावचे ग्रामसेवक, तलाठी यांनीही या लॉकडाउनच्या काळात मोठे परिश्रम घेतले. त्यांनी गावांमध्ये जनजागृती केली. वेळप्रसंगी कठोर भूमिका घेत शासनाचे नियम लोकांना सांगून आपलं गाव कोरोना मुक्त कसे राहील यासाठी प्रयत्न केले अशा कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला.
पुरंदर मधील देवस्थाने, विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट, मंडळे, फाउंडेशन यांनी लोकांना भरभरून मदत केली. देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या खुल्या केल्या. लोकांनी देवाप्रती श्रद्धा व भावनेने दिलेले दान हे लोकांच्या कल्याणासाठी वापरले. पुरंदरमध्ये एकही भूकबळी या काळात गेला नाही. लोकांना दोन वेळचे जेवण मिळत होते हे सर्व श्रेय या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना जाते.
प्रमोद गायकवाड (प्रांताधिकारी पुरंदर-दौंड), रुपाली सरनोबत (तहसीलदार पुरंदर), अण्णासाहेब जाधव (डी.वाय.एस.पी पुरंदर- भोर), गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पुरंदर, एकात्मिक बालविकास सेवा योजना सासवड, सासवड पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, वाल्हा पोलीस दुरक्षेत्र, नीरा पोलीस दुरक्षेत्र, जेजुरी नगरपरिषद, सासवड नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय सासवड, ग्रामीण रुग्णालय जेजुरी, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे, प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा, श्री.मार्तंड देव संस्थान जेजुरी, सौ.राजवर्धीनीताई जगताप (ग्रामीण संस्था), हवेली तालुका शिवसेना प्रमुख संदीप मोडक, भारतीय ज्युबीलंट फाउंडेशन नीरा, येवले फाउंडेशन, सुवर्णस्टार सोशल क्लब जेजुरी, उघडा मारुती मित्र मंडळ जेजुरी, जयदीप बारभाई मित्र परिवार, बहुजन हक्क परिषदे, अजिंक्य टेकवडे मित्र परिवार, एक हात मदतीचा उपक्रम नीरा, नरवीर राजे उमाजी नाईक विकास ट्रस्ट गुळुंचे, पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्ष्कोत्तर संघ, मुख्याध्यापक संघ, पुरंदर तालुका पत्रकार संघ यांना सोमेश्वर रिपोर्टर यांच्या वतीने जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा पत्रकार संघाचे हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष बी.एम.काळे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, श्रीकृष्ण नेवसे, तानाजी झगडे, किशोर कुदळे, विजयकुमार पवार, नालेश जगताप, संतोष डुबल, प्रेस फोटोग्राफर गिरीश झगडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.