पुरंदरच्या गु-होळीतील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ९ लोकांना सासवडच्या कोरंटाईन सेंटरमध्ये पाठवले.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गु-होळी येथील मुंबईहुन आलेल्या एका व्यक्तीचा काल कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील नऊ व्यक्तींना सासवड येथील कोरोना सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील काळात त्यांच्या चाचण्या होणार असल्याची माहिती गु-होळीचे सरपंच संपत खेडेकर यांनी दिली.
लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मुंबईहून गु-होळी येथे मूळ गावी हे कुटुंब दोन तारखेला रात्री लपूनछपून घरी आले होते. मात्र गु-होळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या निदर्शनास दुसऱ्या दिवशी ही गोष्ट आली. त्यांनी तात्काळ त्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेऊन त्यांना कोठेही बाहेर फिरु नये असे आव्हान केले; मात्र त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती तरीही गावात इतरत्र फिरत होता. त्यामुळे एकूण नऊ व्यक्तींना आता सासवड येथील कोरोना सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. यापूर्वी ही या गावात तीनशे साडेतीनशे लोक मुंबई-पुणे व इतर शहरातून आले होते. मात्र या सर्वांचा कोरानटीईन पिर्यड १४ ते २८ दिवस झाला आहे. हे कुटुंब मात्र लपून-छपून आल्याने त्यांना समजून सांगणे पर्यंत यांचा संपर्क काही लोकांशी आला. मात्र ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस पाटील यांनी या कुटुंबातील सदस्यांवर बारकाईने लक्ष ठेवून सतर्कतेची भूमिका घेतली. दोन तारखेला आलेल्या या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी थकवा व ताप आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने त्यांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांना जास्त आजारी पडल्याने त्यांना सासवडच्या कोरोना सेंटरमध्ये चाचणी करून घेण्यात आली व त्याचा काल सोमवारी संध्याकाळी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे पुरंदरच्या प्रशासनाने आज मंगळवारी सकाळी गु-होळी येथे भेट देऊन गु-होळी गावठाण रेड झोनमध्ये घेऊन, संपूर्ण लोकडाऊन केले आहे. इतर वाड्या वस्त्या बफरझोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस कोणीही घराबाहेर पडणार नाही, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. इतर वाड्या वस्त्यांवरील लोकांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुरंदरचे प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखणे मध्ये यापूर्वी यशस्वी झाले आहे, गु-होळीच्या पॉझिटिव्ह रुग्णाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता पुरंदरचे प्रशासन घेत आहे. त्यासाठी घालून दिलेल्या अटी व शर्ती यांचे तंतोतंत पालन ग्रामपंचायत, महसूल, पोलीस पाटील, आरोग्य विभाग करणार असल्याचे गु-होळीच्या पोलीस पाटील कैलास जाधव यांनी सांगितले.