पुरंदर तालुक्यातील कोरोना मृत्यूची संख्या आता नऊ

सोमेश्वर रिपोर्टर live
पुरंदर तालुक्यातील कोरोना मृत्यूची संख्या आता नऊ

पुरंदर :  प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मध्ये वाढ होत असतानाच काल सासवडमधील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्याने आता कोरोना रुग्णांची मृत्यूची संख्या नऊ झाली आहे. 

       काल सासवड येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका रुग्णाचा रात्री मृत्यू झाला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.

      अजूनही वेळ गेलेली नाही पुरंदरकरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा नऊ झाला आहे. एकाच दिवशी रुग्णांचे मोठे आकडे येत असुन, आज कोरोना रुग्णांनी दोनशे अठ्ठावनचा आकडा पार करत आहे. आता जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेल पोर्टल व चॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
To Top