बारामती तालुक्यात ६३ पैकी ५२ अहवाल निगेटीव्ह, १ पॉझिटिव्ह तर १० प्रतीक्षेत

Admin
बारामती तालुक्यात ६३ पैकी ५२ अहवाल निगेटीव्ह, १ पॉझिटिव्ह  तर १० प्रतीक्षेत

सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणि काही लक्षणे आढळलेल्या अशा ६३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी ५२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर  असून १० जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत ठेवण्यात आले 
 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 
              दि १३ रोजी तालुक्यातील २४ जणांची चाचणी करण्यात आली होती त्यापैकी २३ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते, त्यातील एक रिपोर्ट प्रतीक्षेत ठेवण्यात आला होता तो रिपोर्ट देखील निगेटीव्ह आला आहे. 
           बारामती तालुक्यातील तपासण्यात येणाऱ्या रिपोर्ट पैकी सगळेच रिपोर्ट निगेटीव्ह येत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे. 
बारामतीत मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले उद्या दि १६ पासून संपूर्ण बारामती शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे शहरातच कोरोना चाचणी आणि उपचाराची सोय झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाला अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता जास्तीत जास्त व्यक्तींची तपासणी करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत.
To Top