पुरंदरमधील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २२१

Pune Reporter
पुरंदरमधील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २२१

पुरंदर :प्रतिनिधी 
           पुरंदर तालुक्यातील सासवडसह ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज सोमवार दि. १३ रोजी पुन्हा ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील रुग्णांचा एकूण आकडा २२१ झाला आहे

        सासवड येथील ५ व भिवडी येथील २ असे एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. सर्व नवीन रुग्ण आहेत. पुणे येथे केलेल्या खाजगी व शासकीय लॅबरोटरीचे अहवाल आहेत. सदर स्वब तालुक्यातून गेलेले नाहीत. तीन रुग्ण पुण्यात उपचार घेत आहेत. उर्वरित सासवड येथील ट्रिपल सी ला आहेत.

      अजूनही वेळ गेलेली नाही पुरंदरकरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. एकाच दिवशी रुग्णांचे मोठे आकडे येत असुन, आज पूर्ण रुग्णांनी सव्वादोनशे चा आकडा पार केला आहे. आता जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
To Top