पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२३
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या सासवड शहरात लॉकडाऊन नंतर ही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी ५ रुग्ण आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सासवडच्या कोरोना रुग्णांची संख्या ७३ झाली आहे तर पुरंदर तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या २२३ झाली आहे.
सासवड येथून पाठविण्यात आलेला व प्रलंबित असलेल्या स्वॅप चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण सासवड येथील आहे. खाजगी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . रुग्ण सासवड येथील आहे.
दोन्ही रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील आहेत.
अजूनही वेळ गेलेली नाही पुरंदरकरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. एकाच दिवशी रुग्णांचे मोठे आकडे येत असुन, आज पूर्ण रुग्णांनी सव्वादोनशेचा आकडा पार करत आहे. आता जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टर वेब पोर्टल व चॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS