पुरंदरच्या कोरोना रुग्णांनी पार केला ३०० चा आकडा : संख्या ३२५ वर

Admin
पुरंदरच्या कोरोना रुग्णांनी पार केला ३०० चा आकडा : संख्या ३२५ वर

पुरंदर : 
   
       पुरंदर तालुक्यातील सासवड सह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज सकाळी जेजुरी येथील २ रुग्ण आढळल्यानंतर आता सासवड येथील १६ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११.३० पर्यंत पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३२५ झाली आहे.

       सासवड येथून पाठविण्यात आलेल्या १०२ स्वॅप पैकी २४ अहवाल पॉझिटिव्ह. २ खाजगी पॉझिटिव्ह एकूण २६. सोनोरी ६ हाय रिस्क मधील , भिवडी २ हाय रिस्क मधील. सासवड १६, सिंगापूर १ नवीन, पारगाव मेमाणे १ नवीन अशी माहिती पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
To Top