पुरंदरमध्ये कोरोनाची आणखीन २ रुग्णांची भर : संख्या २९९ वर
पुरंदर: प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पाठोपाठ आता जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीतील रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. जेजुरी येथील २ व्यक्तींची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २९९ झाली आहे.
जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ९ स्वॅप पैकी २ जेजुरी येथील नवीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS