मोरगाव मध्ये मागील तीन महिन्यात २३० टन युरियाची विक्री

Admin
मोरगाव मध्ये मागील तीन महिन्यात २३० टन युरियाची विक्री

मोरगांव : विनोद पवार प्रतिनिधी

मोरगांव ता . बारामती येथे गेल्या तीन महीन्यात  २३०  टन  युरीयाची  विक्रमी विक्री झाली आहे .गेल्या पंधरा दिवसापूर्वी युरीयाची कमतरता जाणवत असली तरी सध्या मोठ्या प्रमाणात साठा  असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसत आहे .
          यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीलाच मोठा पाऊस झाला असल्याने खरीपातील बाजरी कांदा , भुईमुग , सुर्यफुल , मुग , मटकी या पिकांची पेरणी मोठ्या  प्रमाणात झाली . बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या  दुकानात एप्रिल ते आज अखेर २९०४ बॅगेची विक्री झाली असल्याचे व्ही. सी यादव   यांनी सांगितले .
गेल्या वर्षाच्या तुलनेने खाजगी  मोरया कृषी भांडार  व न्यु गणेश कृषी सेवा केंद्र येथे साधारणतः १०० टन युरीयाची आवक व विक्री झाली असल्याची मोरया कृषी भांडारचे धनंजय पवार यांनी सांगितले .  गेल्या पंधरा दिवसापुर्वी युरीयाचा मोरगांवमध्ये नव्हता . मात्र  सद्या  तरी पुरेसा साठा खाजगी दुकाने व संघाकडे  असल्याची माहीती  खरेदी विक्री संघाकडुन सांगण्यात आली  .

To Top