सोमेश्वर कारखान्याकडून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १० हजार फळझाडांचे वाटप

Admin
सोमेश्वर कारखान्याकडून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १० हजार फळझाडांचे वाटप

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप कारखाना कार्यस्थळावर बुधवार (दि. २२) पासून सुरु करण्यात आले आहे. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव  आणि संचालकमंडळाच्या वतीने बुधवारी सभासदांना नारळ , आंबा आणि पेरू या झाडांचे वाटप करण्यात आले. अनुदान स्वरूपात सुमारे १० हजार २५० झाडांचे वाटप होणार असून सभासद शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात, घराजवळ ही झाडे लावण्याचे आवाहन यावेळी पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
            अनुदान वजा जाता नारळाचे बाणवली या जातीचे प्रति झाड ८० रुपये, केशर आंबा ८० रुपये आणि सरदार या जातीचे पेरूची झाडे ४० रुपयांना सवलतीच्या दरात कारखान्याने उपलब्ध करून दिली आहेत. कारखान्याच्या वतीने दरवर्षी विविध प्रकारची झाडे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने सभासदांनासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. यामुळे शेतात आणि घराजवळ झाडे लावण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. 
यावेळी कारखान्याचे उस विकास अधिकारी विराज निंबाळकर, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, बी. जी. होळकर, लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर उपस्थित होते. 


To Top