निंबुत- फरांदेनगर 'त्या' वृद्धाच्या संपर्कातील त्याचा मुलगा निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल निंबुत- फरांदेनगर येथील एका वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर त्याच्या संपर्कातील त्याच्या मुलाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःस्वास सोडला.
काल निंबुत फरांदेनगर येथील एका वयोवृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या वृद्धाचा सतत संपर्कातील त्याच्या मुलाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह सोमेश्वर कारखान्यातील कामगारांनी सुटकेचा निःस्वास सोडला. त्या वृद्धाचा निगेटीव्ह आलेला मुलगा हा सोमेश्वर कारखान्यात कर्मचारी म्हणून काम करत होता. त्यामुळे या मुलाच्या संपर्कातील कारखान्यातील काही कामगारांना कारखाना प्रशासनाने क्वारेंटाईन केले होते.
COMMENTS