बारामतीत आज नव्याने पुन्हा ११ पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आज नव्याने पुन्हा ११ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल एकूण ५९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी ४२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या ४२ अहवाल पैकी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामध्ये काल पॉझिटिव्ह आलेल्या गुरुकुल सोसायटी शिव नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा तसेच जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा व मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एक जणांचा, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन जणांचा, मारवाड पेठ येथील एक जणांचा व ख्रिश्चन कॉलनीतील एक जणांचा असे ११अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत
COMMENTS