वाघळवाडी सोमेश्वरनगर मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोहळा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी सोमेश्वरनगर मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोहळा पार पडला.
गावठाण या ठिकाणीं पाणी एकात्मिक जिल्हा परिषद पुणे व ग्रामपंचायत यांच्या एकत्र फंडातून १८ लक्ष रू १ लाख लीटर क्षमतेच्या उंच पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक श्री रामचंद्र काका सकुंडे यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी सरपंच नंदा सकुंडे होत्या. १४ वित्त आयोगातून पुढील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. मांगडे वस्ती याठिकाणी भूमिगत गटार - ३.५ लक्ष रुपये तसेच पिण्याच्या पाण्याचे वितरण लाईन २.५ लाख रुपये, हरणाई वस्ती भूमिगत गटार ५.५ लक्ष रुपये व सावंत वस्ती भूमिगत गटार २.५ लक्ष रुपये पिण्याची वितरण लाईन २.० लक्ष रुपये या सर्व कामांचे भूमिपूजन गावातील पदाधिकारी जेष्ठ नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडले .या कार्यक्रमाच्या कोरोना या आजारामुळे मुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला व कोरोना आजारामुळे सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे अावहान सरपंच नंदा सकुंडे यांनी केले गावातील सर्व विकासकामे लवकरात लवकर चालू करण्यात येतील ती कामे दर्जेदार पणे पूर्ण करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येईल विकास कामांना नागरिकांनी सहकार्य करावे.
या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादीचे तालुका उपध्यक्ष सतीश सकुंडे तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव सावंत उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादी तालुका महिला संघटक सुचिता साळवे समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत युवा नेते तुषार सकुंडे, दादू मांगडे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड गावातील ग्रामस्थ महिला युवक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.
COMMENTS