पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना उपचारात २५ टक्के सवलत : सोमेश्वर आयसीयू चा उपक्रम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचारी यांना कोणत्याही आजारावरील उपचारात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय वाघळवाडी येथील सोमेश्वर आयसीयु या हॉस्पिटलने घेतला आहे.
आज जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोलापूर बस आगरप्रमुख रमाकांत गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब गायकवाड आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या हस्ते पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना
हॉस्पिटलची अधिकृत पत्र देण्यात आली. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विक्रम भोसले, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, मुरूमचे उपसरपंच निलेश शिंदे, निलेश गायकवाड,अनिल गायकवाड डॉ अनिल देशमुख डॉ सूरज सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस खात्याच्या वतीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सह्ययक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि पोलीस हवालदार महेंद्र फणसे यांनी तर पत्रकारांच्या वतीने बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, पत्रकार संतोष शेंडकर, हेमंत गडकरी, युवराज खोमणे आणि विनोद गोलांडे यांनी या पत्रांचा स्वीकार केला.
सोमेश्वर आयसीयु चे प्रमुख डॉ अनिल कदम आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. पोलीस पत्रकार आणि आरोग्य कर्मचारी यांना अशा प्रकारच्या सुविधा देणारे सोमेश्वर आयसीयु हॉस्पिटल एकमेव ठरले आहे.
COMMENTS