पुरंदर तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी : एकुण रुग्ण २१४

Admin
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी : एकुण रुग्ण २१४

पुरंदर : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या मध्ये वाढ होतानाच. एका व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे तर आज सकाळी पुरंदरच्या ग्रामीण भागातील दोन व्यक्तींचा कोरोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २१४ झाली आहे.

       सकाळी सासवड येथील खाजगी तपासणीचा एक अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. दुपारी तोंडल गावातील औंध येथे उपचारासाठी दाखल असलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भिवडी गावातील  ससुन हॉस्पिटलमध्ये  एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला. तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.

      आता पुरंदरकरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. एकाच दिवशी रुग्णांचे मोठे आकडे येत असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच गावकट्टा वेब पोर्टल व चॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
To Top