डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

Pune Reporter

डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

  बारामती ,प्रतिनिधी 

  डॉक्टर्स डे निमित्त येथील इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, यांच्या हस्ते तर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे,  म.   महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. 

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने बारामतीच्या डॉक्टरांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर कौतुकास्पद असल्याचे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी यावेळी बोलतना व्यक्त केले व्यक्त केले. 

   यावेळी आय एम एचे माजी अध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, खजिनदार डॉ. सौरभ मुथा, मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बापू भोई, डॉ. एम आर. दोशी. इंडियन डेंटल असोशियशनचे डॉ. आशुतोष आटोळे, डॉ. मोहन पाटील, डॉ. अविनाश आटोळे, डॉ.सोमनाथ राऊत,  डॉ. प्रीतम ललगुनकर, आदी उपस्थित होते.  

  बारामती येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचालितच्या लेट माणिकबाई चंदुलाल सराफ या रक्त पेढीने रक्त संकलन केले. तर यावेळी इंडियन  रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ अशोक दोशी तर आयम.  बारामतीच्या अध्यक्ष डॉ.  विभावरी सोळूखे, सचिव डॉ.  संतोष घालमे यांनी उपस्थित मन्यवराचा स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांना कोरोना वाॅरिअर म्हणून प्रमाणपत्र इंडियन मेडिकल असोशिशन बारामतीच्या वतीने देण्यात आले. 

To Top