चतुर्थी निमित्त मोरगाव मध्ये 'कळस' दर्शन साठी गर्दी

Admin
चतुर्थी निमित्त मोरगाव मध्ये कळस दर्शन साठी गर्दी

मोरगाव : प्रतिनिधी

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगांव ता . बारामती येथील मयुरेश्वर  मंदिर  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आज चतुर्थी असल्याने  आपली चथुर्तीची दर्शन चुकू नये म्हणून परीसरात  अनेक भाविक कळस दर्शनासाठी आले होते .
           राज्य शासनाने राज्यातील मंदिर सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय न दिल्याने सुचनांचे पालन करुन    राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रासह अष्टविनायक  तीर्थक्षेत्र मंदिर  बंद आहेत. मात्र तरीही आज संकष्टी चतुर्थी असल्याने  तालुक्‍यातील अनेक भाविकांनी मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आले होते .  मंदिर बंद असल्याने  भाविक  पायरी व शिखर  दर्शनाच्या निमित्ताने  मोरगांव येथे आले होते . 
         आज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात  तालुक्यातील  व परिसरातील भाविक आलेले दिसत होते .  बाहेरून दर्शन  घेताना कोरोनाचे   संकट जाऊन मंदिर चालु  व्हावे व श्रींचे दर्शन घडावे अशी मनोमन प्रार्थना करताना आढळत होते. मात्र भावीकांनी घरीच सुरक्षित रहावे व येण्याचे टाळावे असे आवाहन चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विनोदपवार यांनी  केले  आहे .
To Top