धक्कादायक ....वाणेवाडी-विकासनगर येथे अजून दोन कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Admin
धक्कादायक ....वाणेवाडी-विकासनगर येथे अजून दोन कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या विकासनगर येथे अजून दोन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
            वाणेवाडी येथील विकासनगर येथील दि २७ रोजी एका जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काल त्याच्या संपर्कातील १६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील १४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
           आज सकाळीच वाणेवाडी येथील एका जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाणेवाडीची एकूण रुग्णसंख्या ५ वर पोहचली आहे. आज दिवसभरात वाणेवाडीतील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. 
To Top