मानवाधिकारच्या जिल्हा सचिवपदी सौरभ रावत याची निवड
भोर : प्रतिनिधी
केंद्रीय मानवाधिकार संघटनच्या पुणे जिल्हा सहायक सचिवपदी नसरापूर ( ता. भोर ) येथील सौरभ हरीश रावत या युवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व समाज बांधवाना त्यांचा हक्क, न्याय व मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार निवडीप्रसंगी रावत यांनी सांगितले.
केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली कार्यालयाच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवले यांच्याकडून सौरभ रावत याची निवड झाल्याचे नियुक्तपत्र व ओळखपत्र देण्यात आले आहे. नियुक्तपत्रात मानवाधिकाराचे संरक्षण करणे, चुकीचे सरकारी काम, धर्मनिरपेक्षता शिक्षण, आरोग्य, पर्यावरण सामाजिक आदी अन्यायकारक बाबत सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. सौरभ रावत याची निवड झाल्याने परिसरातून त्याचे कौतुक अभीनंदन होत आहे.
COMMENTS