'वाणेवाडी' येथील एका जनाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह : वानेवाडीची रुग्णसंख्या ३ वर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील एका जनाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दि २० रोजी करंजेपुल येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, ते दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी आले. त्यानंतर दोन दिवसापूर्वी करंजेपुल पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह आला त्याच्या संपर्कातील आता तिघांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वानेवाडी येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह असून काल विकासनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांची तपासणी करण्यात आली असून अजून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
वाणेवाडीत आज पुन्हा एक कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून वानेवाडी तील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ झाली आहे. आज सकाळी वाणेवाडी येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर पुणे या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
तसेच बारामती तालुक्यात काल दिवसभरातील संख्या ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, बारामतीची रुग्णसंख्या ७५२ झालेली आहे
पॉझिटिव आलेल्यांमध्ये शिवनगर माळेगाव येथील तीन जण, सोनवडी सुपे येथील एक जण, करंजेपुल येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तीन जन, पणदरे येथील एक जण, माळेगाव येथील एक जण, लोणीभापकर येथील दोन जण तसेच शहरातील कसबा येथील दोन जण, तांदूळवाडी येथील तीन जण, देशपांडे हॉस्पिटल येथील एक जण, खंडोबानगर येथील एक जण, म्हाडा कॉलनी येथील एक जण, शरद नगर येथील एक जण, संघवी पार्क येथील एक जण, बारामती शहरातील तीन जण,जळोची येथील एक जण, चंद्रमणीनगर येथील एक जण व जामदार रोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे तसेच बारामतीतील मृत्यूची संख्या 33 झाली असून बरे झालेल्यांची संख्या ४२६ आहे
COMMENTS