'करंजेपुल' च्या 'त्या' पेशेंटच्या संपर्कातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या त्या रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
दि २० रोजी करंजेपुल येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, ते दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी आले. त्यानंतर दोन दिवसापूर्वी पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह आला त्याच्या संपर्कातील आता तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वानेवाडी येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह असून काल विकासनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांची तपासणी करण्यात आली असून अजून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
काल बारामती मध्ये एकूण १८६ जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी १३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अठरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच बारामती शहरातील सतरा व ग्रामीण भागातील ११ अशा २८ जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आलेला असून इंदापूर व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे बारामतीतील रुग्णसंख्या ७७६ झालेले आहे तसेच काल रात्री बारामतीतील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असलेल्या शहरातील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे
COMMENTS