मित्रांच्या आर्थिक मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्यचं गिफ्ट : मैत्रदिनाची अनोखी भेट

Admin
 मित्रांच्या आर्थिक मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्यचं गिफ्ट : मैत्रदिनाची अनोखी भेट

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

त्यांच्या मित्राला निमोनिया होतो. बारामतीत त्याला कुठल्याच दवाखान्यात घेतलं जातं नाही. त्याच्यासाठी मित्रांची फौज उभी राहते.  तिथून शर्यत सुरू होते ते त्याला जगवण्याची.. आज त्याचं ऑपरेशन सुखरूप झालं आहे. शेकडो मित्रांकडून त्याला मैत्रदिनाचे अनोखे गिफ्ट मिळाले आहे. 
            मुरूम ता बारामती येथील एक मनमिळाऊ युवक नितीन बनकर...मात्र त्याला नितीन बनकर या त्याच्या खऱ्या नावाने कोणाचं ओळखत नाही. सोमेश्वरनगर परिसरसह बारामती तालुक्यात तो ' जॅक्सन' याच नावाने परिचित आहे. 
          काही दिवसापूर्वी मुरूम ता बारामती येथील स्थायिक असलेला आणि चालक म्हणून नोकरी करणारा जॅक्सनला त्रास जाणवू लागतो. त्याला कोरोना असेल म्हणून बारामती येथे त्याची कोरोना टेस्ट घेतली जाते. तो निगेटीव्ह येतो, दुसऱ्या दिवशी  त्याच्या आई वडिलांना कोरोना टेस्ट साठी नेले जाते. त्या दोघांची टेस्ट निगेटीव्ह येते. मात्र  या दोघांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली खरी मात्र त्या दोघांना निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. जॅक्सन ला निमोनिया झाला होता. बारामती मधील एका ही डॉक्टर ने त्याला ऍडमिट करून घेतले नाही. आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमने यांच्या मध्यस्थीने त्याला बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली मध्ये ऍडमिट केले जाते. मात्र जॅक्सन ची परिस्थिती खालावत चालल्याने त्याला पुण्याला ससून ला हलवावे असे डॉक्तरांनी सुचवले. 
          जॅक्सन ने पण आयुष्यात मित्रांची फौज उभी केली होती. जॅक्सन ला ससून ला घेऊन जाणे म्हणजे आपला मित्र गमवणे, असे मित्रांना वाटले. आणि तिथून सुरू होते जॅक्सन ला जगावण्याची धडपड... जॅक्सन ला मुंबई, पुणे, बारामती कुठेच नेयचे नाही. जॅक्सन वर सोमेश्वरनगर मध्येच उपचार करायचे. वाघळवाडी येथील सोमेश्वर आयसीयु चे डॉ अनिल कदम आणि व्यवस्थापक ऋषी गायकवाड यांच्याशी चर्चा होते. जॅक्सन च्या छातीत पाणी झाले होते. घरची परिस्थिती हालाकीची...ऑपरेशनला दोन लाखाच्या आसपास खर्च...तरीही मित्रांनी हार नाही मानली. ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि दुसरीकडे एकच धावपळ मित्राच्या ऑपरेशन साठी पैसे गोळा करण्याची...व्हाट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर मदतीचे मेसेज पडू लागले. आकाश सावळकर, स्वप्नील काकडे आणि राहुल यादव हे तीन मित्र पुढाकार घेतात. याला मित्रांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आज अखेर दीड लाखाच्या वर रक्कम जमा झाली आहे. जॅक्सन चं ऑपरेशन यशस्वी झालं आहे. हजारो मित्रांमधून निघून चाललेल्या जॅक्सन ला मैत्रदिनी असले गिफ़्ट मिळाले. याला जॅक्सन चे भाग्यच म्हणावे लागेल. 
         मात्र त्याच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. सोमेश्वरनगर येथे जॅक्सन चे जेंव्हा ऑपरेशन सुरू होते, त्याच दिवशी बारामती या ठिकाणी त्याच्या जन्मदात्या बापच निमोनियाने निधन झाले. आपला बाप अपलेला सोडून गेला आहे ही बाब अजून जॅक्सन ला माहीत नाही. आणि त्याच्या मित्रांनी किंवा घरच्यांनी त्याला कळू ही दिली नाही. जॅक्सन अजून दवाखान्यातच आहे. त्याला लवकरच घरी सोडले जाईल. घरी गेल्यावर त्याला जेंव्हा आपले वडील दिसणार नाहीत तेंव्हा जॅक्सन हंबरडा फोडल्याशिवाय राहणार नाही.

To Top