सोमेश्वरनगर दि १५
वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाने वीर धरणातून निरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला आहे
वीर धरणामधून नीरा नदी मध्ये ८०० क्युसेस विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातुन सोडण्यात येणा-या विसर्गमधे वाढ करुन तो ४०हजार४६२ क्युसेस साय ५.०० वाजता करण्यात आला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो अशी माहिती धरण प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणी ही जाऊ नये. हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.