वडगाव निंबाळकर पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्या २० जणांकडून १० हजारांचा दंड वसूल

सोमेश्वर रिपोर्टर live
वडगाव निंबाळकर पोलिसांकडून  विनामास्क फिरणाऱ्या २० जणांकडून १० हजारांचा दंड वसूल

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील करंजेपुल, सोमेश्वर, वाघळवाडी, वानेवाडी या गावातून विनामास्क फिरणाऱ्या २० जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 
          आज शनिवार दि २९ रोजी ही कारवाई करण्यात आली, दिवसेंदिवस करंजेपुल, वानेवाडी या भागातून कोरोनाची रुग्ण सापडत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस नाईक नितीन बोराडे, अक्षय सिताप आणि गौतम लोहकरे यांच्या टीमने ही कारवाई केली.
To Top