लोणंदमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे
पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
लोणंद : प्रतिनिधी मंगेश माने
भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर घेऊन जाणारे व
हॉकी या खेळात देशाला ऑलंम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारे तसेच ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जाते ते मेजर ध्यानचंद सिंग यांना त्यांच्या जयंती दिनी त्यांना खंडाळा तालुक्यातील लोणंद मध्ये अभिवादन करण्यात आले.मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा भारतीय क्रीडा दिवस म्हणून देशात साजरा केला जात असतो.रयत शिक्षण संस्थेचे मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच यावेळी राज्य राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्या सुनंदा नेवसे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू सयाजी तिरमके, पर्यवेक्षक शटकले सर ,शारीरिक शिक्षण संचालक महेश जाधव, अजित कदम ,पत्रकार मंगेश माने ,ए.वाय.जाधव , राजू भोये आदी शिक्षक तसेच विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन तेजस शेळके व राजू धायगुडे यांनी केले
COMMENTS