बारामतीत काल दिवसभरात १७ जण कोरोना बाधित : रुग्णसंख्या ४५८ वर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल दिवसभरात rt-pcr तपासणीसाठी घेतलेल्या 89 नमुन्यांपैकी 84 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत, प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 81 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून शहरातील बारामती शहरातील टी सी कॉलेज जवळील एक रुग्ण, उर्जा भवन येथील एक रुग्ण व कसबा बारामती येथील एक रुग्ण अशा तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच काल rt-pcr तपासणीसाठी 135 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्यापैकी 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 109 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच काल दिवसभरात बारामती मध्ये खाजगी प्रयोगशाळेत एकूण 63 नमुने एॅंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील तीन असे एकूण 17 रुग्ण एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे काल रात्री पर्यंत बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 458 झालेली आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
एॅंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील कसबा येथील एकाच कुटुंबातील पाच जण तसेच माळेगाव रोड बारामती येथील एक जण, तसेच निर्मिती हिल्स माळेगाव रोड येथील एक जण,पान गल्ली येथील एक जण, वनवे मळा येथील एक जण, खंडोबा नगरमधील एक जण, पाटस रोड येथील एक जण, शिवाजीनगर भिगवन रोड येथील एक जण, अमराई येथील एक जण व जामदार रोड येथील एक असे 14 रुग्ण व माळेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला तसेच कटफळ येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक महिला व मूर्टी येथील एक वृद्ध असे तीन रुग्ण एंटीजेन पॉझिटिव्ह आले आहेत