पवारवाडी जिल्हा परीषद शाळेच्या संरक्षक भिंतीस १० लाखाचा निधी मंजुर : सरपंच रेश्मा खोमणे यांच्या हस्ते भूमीपूजन

Admin
पवारवाडी जिल्हा परीषद शाळेच्या संरक्षक भिंतीस १० लाखाचा निधी मंजुर : सरपंच रेश्मा खोमणे यांच्या हस्ते भूमीपूजन 

मोरगाव : प्रतिनिधी

पवारवाडी ता. बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीस संरक्षक भिंत बांधकाम  मंजूर झाले  आहे. सुमारे दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या कामाचे  भूमिपूजन सरपंच रेश्मा संतोष खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले.
          तरडोली नजीक पवारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीस जिल्हा परीषदेकडुन  सुमारे  दहा लाख रुपयांचा निधी   मंजूर झाला  आहे. या  संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आज सरपंच  रेश्मा संतोष खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी  पंचायत समिती सदस्य राहुल भापकर  ,माजी सरपंच किसन तांबे  , हनुमंत भापकर,  नवनाथ जगदाळे  , संतोष खोमणे ,  गोरख मेमाणे कैलास शिंदे , भगवान धायगुडे ,  ठेकेदार ऋषीकेश  पवार  आदी उपस्थित होते . 
              सदर संरक्षक भिंत काम  ३३५  फुट लांब व ३०० फुट  रुंदीचे होणार आहे . पवारवाडी येथील ईयत्ता ४ थी पर्यंतची  जिल्हा परिषद शाळा ओढ्याकाठी आहे . यामुळे पाणी  , सरपटणारे प्राणी या सर्वच दृष्टीने  मुलांचे संरक्षण होणार असल्याने येथील पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.


To Top