बारामतीत रक्ताचा तुटवडा,रक्तदान करण्याचे आवाहन.

Pune Reporter

बारामतीत रक्ताचा तुटवडा,रक्तदान करण्याचे आवाहन.

बारामती-प्रतिनिधी

बारामतीमध्ये वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव होत असल्याने रक्तदात्यांनी ब्लड बँकेकडे पाठ फिरवली असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले असल्याचे येथील लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून मत व्यक्त केले आहे.

रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र नागरिकांनी कोरोणाची भीती मनात बाळगल्याने रक्त संकलन करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेतरक्त संकलन होत नसल्या कारणाने बारामतीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे.

सध्या बारामती परिसरातील रुग्णालयांमध्ये डेंगू सदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्या रुग्णासाठी लागणाऱ्या प्लेटलेटसचा देखील मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी मागणी आहे मात्र  रक्ताचा  तुटवडा  असल्याने, ब्लड बँकेत सध्या प्लेटलेट उपलब्ध नाहीत रक्तदान झाल्यास त्या गरजू रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देता येतील. 

रक्तदान केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा कोणताही धोका होणार नसून इच्छुक रक्तदात्यांनी आणि शिबीर आयोजकांनी येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीत जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांना 9096383959 यावर संपर्क करून पाच – पाच च्या गटाने  रक्तदान करावे जेणे करून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे सोपे होईल असेही आवाहन डॉ दोशी यांनी केले आहे. 

To Top